आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपोत्सव:अंबडला मत्स्योदरी देवी मंदिर परिसरात दीपोत्सव

अंबडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहराचे आराध्य दैवत असलेल्या श्री मत्स्योदरी देवी मंदीरावर दिपावली नंतर दीपोत्सव मोठया उत्साहात साजरा केला जातो. मत्स्योदरी दीपोत्सव मंडळ मागील अठरा वर्षापासून हा उत्सव अखंडपणे राबवत आहे. हजारो दिव्यांनी मंदिर परिसर उजळून निघतो. यात शहरातील प्रत्येक नागरिक सहभागी होत असल्यामुळे हा दिपोत्सव न राहता लोकोत्सव झाला आहे. यंदाचा दिपोत्सव ७ नोव्हेंबर रोजी होत आहे. यासाठी मंडळाचे पदाधिकारी जय्यत तयारीला लागले आहेत.

सोमवारी त्रिपुरारी पौर्णिमा आहे. मत्स्योदरी देवी मंदीर परिसरात सायंकाळी ५.३० वाजता या नयनरम्य दीपांच्या लखलखणा-या दीपांच्या ज्योतीला आपापल्या नयन चक्षुमध्ये साठवण्यासाठी सद्भक्तांनी मंदीर परिसरात उपस्थित रहावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने चंद्रकांत देशपांडे, श्रीपाद देशपांडे, यदुनाथ जपे, वसंतराव कुलकर्णी, लक्ष्मीकांत देशमुख, विकासराव देशपांडे, हेमंत कुलकर्णी, प्रवीण देशमुख, ज्ञानेश देशमुख तसेच दीपसेवकांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...