आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीशी अनैतिक संबंध ठेवत बदनामी:पतीची आत्महत्या, 18 दिवसांनी 5 जणांविरोधात गुन्हा, भोकरदन तालुक्यातील घटना

पारध (जि. जालना)6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील एका २५ वर्षीय तरुणाने विष घेऊन १८ दिवसांपूर्वी म्हणजेच २ नोव्हेंबरला आत्महत्या केली. त्या वेळी या आत्महत्येचे कारण अस्पष्ट होते. दरम्यान, आता या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे. मृताच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून पाच जणांविरुद्ध पारध पोलिसांत गुन्हा दाखल केला. धक्कादायक म्हणजे पत्नीवर बलात्कार करून त्याची शूटिंग करत आरोपींमध्ये झालेल्या संवादाची क्लिप पीडित महिलेच्या पतीला दाखवली होती. समाजात बदनामी होईल या भीतीने त्या तरुणाने विष घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

गावातील रवी सपकाळ, गजानन सिरसाठ, गजानन देशमुख व अन्य दोन महिलांनी गुंगीचे औषध देऊन तिच्यासोबत अश्लील चाळे केले. त्याचे चित्रीकरण मोबाइलमध्ये केले. शिवाय तिच्यासोबत बळजबरी शारीरिक संबध ठेवले. या प्रकरणानंतर पीडित महिला, संबंधित संशयित आरोपी यांच्या संभाषणाच्या ऑडिओ क्लिप महिलेच्या पतीला पाठवल्या. त्यामुळे समाजात बदनामी होत असल्याने पीडित महिलेच्या पतीने विष प्राशन करून आत्महत्या केली. यानंतर पारध ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

बातम्या आणखी आहेत...