आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावृक्ष लावून त्याचे संवर्धन करून आणि वृक्षांची कत्तल थांबून प्राणवायूचे रक्षण न झाल्यास निश्चित मानवासहित सर्वच जिवांचा ऱ्हास झाल्याशिवाय राहणार नाही, असे शाहीर नानाभाऊ परिहार यांनी सांगितले.
जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक येथे माहिती आणि प्रसारण मंत्रालय क्षत्रिय लोक संपर्क ब्युरो औरंगाबाद यांचे वतीने ग्रामीण विकास प्रतिष्ठान कोनड बु.जि. जालना तसेच धरती धन ग्रामविकास संस्था जालना यांच्या संयुक्त विद्यमाने शाहीर परिहार आणि संच यांनी आपल्या पारंपारिक शाहिरी कला पथकातून, निसर्गासी खेळ खेळून, आपणच केला गुन्हा, तुम्ही शहाणे मानस, पटलं तर व्हय म्हणा ll या गीतातून पर्यावरणाचा संदेश दिला. यावेळी सरपंच संतोष ठाकरे, ग्रामविस्तार अधिकारी राजेंद्र परिहार, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष करडेल, जय मल्हार वाघे मंडळ, नारायण करडेल, रामदास करडेल, देविदास भेलके, माणिकराव करडेल, छगन बर्डे, रामदास शिंदे, भगवान शेळके, भीमराव वाघमारे, शाहीर कडुबा साळवे, यांच्यासह ज्ञानेश्वरी भजनी मंडळ, लोकमाता अहिल्याबाई होळकर महिला मंडळ, सरस्वती महिला मंडळ, मुक्ताई महिला मंडळ, श्रीदत्त महिला मंडळ, मुक्ताई महिला मंडळ कोनाड बु. रेणुकाई महिला मंडळ कोनड बु. संप्रदाय व संगीत भजनी मंडळ कोनड बु. जय मल्हार वाघे मंडळ कोनड बु., जय मल्हार वाघे मंडळ भारज खुर्द जय मल्हार वाघे मंडळ भराडखेडा ,श्री गजानन भजनी मंडळ सोनखेडा, मुक्ताई भजनी मंडळ कोनड खुर्द, राजमाता जिजाऊ महिला मंडळ कोळेगाव, मुक्ताई भजनी मंडळ कोळेगाव, लोकरंग कलामंच चांदई ठोंबरे यांनी सहभाग घेऊन पर्यावरणाचा संदेश दिला. तसेच पर्यावरणावर आधारित वृक्षारोपण, रांगोळी स्पर्धा, प्रश्नमंजुषा, आणि संपूर्ण गावातून रॅली काढून काढण्यात आली. तहसीलदार स्वरूप कंकाळ, संतोष देशमुख यांनी मार्गदर्शन केले.सुत्रसंचालन मिलींद सावंत यांनी तर पवार यांनी आभार मानले. यावेळी गणेश पवार, डॉ. प्रीती राजगुरू, विस्तार अधिकारी गजानन लहाने, सोनू जाधव, निवृत्ती वाघ आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.