आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईद मिलन:बंधुभावाने समाजात वागल्यास निश्चितपणे नवनिर्माण शक्य; आ. कैलास गोरंट्याल यांचे प्रतिपादन, जालना शहरात कार्यक्रम

जालना10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

समाजामध्ये जातिभेद आणि द्वेष निर्माण करणाऱ्यांना कधीच राजकीय सत्ता मिळू शकत नाही. बंधुभावाने समाजामध्ये वागल्यास निश्चितपणे नवनिर्माण होणे शक्य आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा आमदार कैलास गोरंट्याल यांनी केले.

टिपू सुलतान ब्रिगेडच्या वतीने ‘ह. मोहंमद पैगंबर सर्वांसाठी’ या अभियानांतर्गत जालना शाखेच्या वतीने अनाथ, विधवा, आत्महत्याग्रस्त शेतकरी आणि रंजल्यागांजल्यासाठी ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात करण्यात आले होते त्या वेळी आमदार गोरंट्याल बोलत होते. या वेळी शेख सुभान अली, टिपू सुलतान ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष जहीर पठाण, शेख महेमूद, सय्यद करीम बिल्डर आदींची उपस्थिती होती.

आमदार गोरंट्याल म्हणाले, राज्यातील जनता नेहमी फुले-शाहू-आंबेडकर विचाराच्या सोबत राहिलेली आहे. परंतु काही मंडळी समाजामध्ये विष पेरण्याचे काम करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा उद्योग करीत आहे. त्यांना कधीच यश मिळणार नाही. आणि जनतेनेदेखील त्यांच्या राजकीय डावाला ओळखलेले आहे. टिपू सुलतान ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष शेख सुभान अली म्हणाले, राज्यामध्ये बहुजन समाजाने फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार समाजात रुजवत असताना १ कोटी २० लाख मराठी मुस्लिमांना सोबत घेऊन मोहमंद पैगंबर यांनी मानव जातीच्या कल्याणासाठी दिलेला महत्वपूर्ण संदेश समजून घ्यावा. इस्लाम धर्माने जाती भेद मानला नाही. आणि आपण सर्व एकच आई-वडिलांची लेकरे आहोत अशी शिकवन देऊन माणसामानसाला जोडण्याचे काम केलेले आहे.

परंतू काही मंडळी जाती भेदाचे भांडण लावून समाजामध्ये दुही पसरवित आहे. या वेळी अनाथ, विधवा, आत्महत्याग्रस्त शेतकरी आणि गोरगरिबांना कपडे, साड्या इतर समाज उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी राम सावंत, सय्यद नदीम, डॉ. विशाल धानुरे, शेख शकील, नंदाताई पवार, जावेद बेग, मोहमंद उस्मान मोमीन, शेख शमशोद्दीन, शेर जमाखान, रवींद्र गाढेकर, अफसर चौधरी, अॅड. कामरान खान, सलिम काजी, मुजमिल कुरेशी, मुफ्तार खान, हाफेज फारूख, चंद्रकांत रत्नपारखे, शेख वसीम, इम्रान बिल्डर, जावेद पठाण, शेख मन्सूर, शेख मुजाहेद, सिरगुळे, करीम लोहार बिल्डर, साजेद बिल्डर, नारायण वाढेकर, शेख जावेद, शेख शाकेर, इलियास मुसा, मजहर खान, अफसर मिर्झा, अबुबकर चाऊस आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सय्यद करीम बिल्डर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आता मोहंमद बक्षी यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...