आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेरणा:देहेडकर यांचे कार्य नव्या पिढीला प्रेरणा देणारे

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामाजिक, राजकीय कार्यात निस्सीमपणे अविरत ध्यास घेत समाजहिताचा विचार करणारे रमेश देहेडकर यांचे कार्य नव्या पिढीला प्रेरणा देणारे आहे,असे गौरवोद्गार आमदार कैलास गोरंट्याल गौरव समारंभात बोलताना केले.

पाच दशकांपासून सामाजिक, शैक्षणिक कार्यासह पत्रकारिता क्षेत्रात कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते रमेश देहेडकर कार्य गौरव समारंभाचे आयोजन मुद्रा साहित्य सेवा संस्थेतर्फे करण्यात आले होते.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, रसना देहेडकर, ब्राह्मण सभेचे अध्यक्ष कल्याणराव देशपांडे, जेष्ठ साहित्यिक डॉ. रावसाहेब ढवळे, डॉ. सुहास सदाव्रते, राम गायकवाड, अंकुशराव राऊत, राजू जाधव, अशोक साबळे, कैलास भाले, प्रा.पंढरीनाथ सारके यांची उपस्थिती होती. आयुष्याची पन्नास वर्ष सामाजिक, राजकीय कार्यात निष्ठेने काम करताना अनेक कटूगोड अनुभव आले. परंतु समाजाचे आपण देणे लागतो ही प्रांजळ भूमिका घेवून राजकीय क्षेत्रात यश मिळवू शकलो नाही, याची खंत रमेश देहेडकर यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रभाकर शेळके यांनी तर कवी शिवाजी तेलंग यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...