आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संरक्षण भिंत:शिवणगाव येथे विकास- कामे करण्यास विलंब ; संरक्षण भिंत बांधणे आवश्यक

कुंभार पिंपळगाव3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घनसावंगी तालुक्यातील शिवणगाव येथे विविध विकास कामे करण्याबाबत पालकमंत्री राजेश टोपे यांनी आदेश दिलेले असतानाही अधिकाऱ्यांकडून कामे करण्याऐवजी खो दिला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला शिवणगाव ते शिवणगाव फाटा येथे रस्त्याचे काम चालू आहे. या रस्त्यांतर्गत जिल्हा परिषदेचे ४ छोटे पूल असून ते जीर्ण झाले आहेत.

रस्त्याबरोबर छोटे पूल बांधणे आवश्यक आहे. पूल झाल्यास शेतकऱ्यांना पाइपलाइन करण्यासाठी रस्ता फोडावा लागणार नाही. उसाची वाहतूकही याच रस्त्यावरून होत असते. तसेच शिवणगाव येथील जि. प. शाळा गोदावरी नदीच्या कडेला आहे. परिसरातील १५० विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात, अतिक्रमण व विद्यार्थी नदीकडे जाऊ नयेत व कोणतीही अनर्थ घटना होऊ नये यासाठी संरक्षण भिंत बांधणे आवश्यक आहे. दलित वस्तीमधील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता होणे गरजेचे आहे. याबाबत माजी सरपंच सुर्यकांत तौर मागील १८ महिन्यापासून पाठपुरावा करत आहे. ही कामे त्वरीत सुरु करण्यात यावीत, अन्यथा ज उपोषण करण्याचा इशारा दिला.

बातम्या आणखी आहेत...