आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध‎:शिक्षकांच्या पगारास‎ विलंब; शासनाचा निषेध‎

जालना8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिन्याचा एका तारखेला शिक्षकाचे‎ वेतन हाती देण्यात येईल, असा निर्णय‎ शासनाकडून घेण्यात आला होता.‎ मात्र, दिवाळीपासून शिक्षकांच्या‎ वेतनासाठी महिन्याला लागणाऱ्या २५‎ कोटी रुपयांपैकी केवळ १३ कोटी रुपये‎ मिळत आहेत. परिणामी शिक्षकांना‎ एका महिन्याआड वेतन मिळत आहे.‎ यामुळे विविध कर्जाचे हप्ते तसेच इतर‎ खर्चाची अडचण शिक्षकांवर येत‎ आहे. शासनाच्या या प्रकाराच्या‎ विरोधात २५ जानेवारी रोजी‎ जिल्ह्यातील ३०० हून अधिक‎ शाळांच्या शिक्षकांनी काळ्या फिती‎ लावून शासनाचा निषेध केला.‎

दिवाळीपासून जिल्ह्यातील‎ शिक्षकांच्या वेतनाची मोठी समस्या‎ निर्माण झाली आहे. वेतनासाठी‎ आवश्यक असलेला निधी‎ शासनाकडून दिला जात नाही. त्यामुळे‎ जिल्ह्यात चार - चार तालुक्यांच्या गट‎ करून वेतनाचे टप्पे करण्यात आले‎ आहेत. मात्र, या महिन्यात दुसऱ्या‎ टप्प्याच्या वेतनासाठी सुद्धा‎ शासनाकडून पुरेसा निधी देण्यात‎ आला नाही. दुसऱ्या टप्प्यातील‎ वेतनासाठीसुद्धा पाच कोटी रुपये कमी‎ पडले आहेत. दोन दोन महिने वेतन‎ रखडत असल्यामुळे जिल्ह्यातील‎ शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला‎ आहे.

गृह कर्ज पतसंस्था व इतर‎ बाबींसाठी घेतलेल्या कर्जांचे हप्ते‎ रखडले आहेत.यामुळे शिक्षक‎ आर्थिक संकटात सापडले आहेत. ही‎ बाब निदर्शनास आल्याने जिल्ह्यातील‎ सर्व शिक्षक संघटनांची बैठक‎ मल्टिपर्पज हायस्कूल येथे नुकतीच पार‎ पडली. त्यात पहिल्या टप्प्यात काळ्या‎ फिती लावून निषेध करण्याचे निश्चित‎ करण्यात आले होते. त्यानुसार बहुतांश‎ सर्व शाळांवर प्रतीकात्मक आंदोलन‎ करण्यात आले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...