आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:कारला येथे निकृष्ट काम बंद करून ठेकेदाराविरोधात कार्यवाहीची मागणी

सिंधी काळेगाव6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना तालुक्यातील कारला गावात अंगणवाडी तसेच सिमेंट रस्ते आदी कामे सुरू आहेत. परंतु ही कामे निकृष्ट दर्जाची केली जात आहेत. सुरू असलेल्या या सर्व कामावर अधिकारी वर्गाने प्रत्यक्षरीत्या पाहणी करावी होत. असलेली निकृष्ट दर्जाची कामे तात्काळ बंद करून सदर ठेकेदाराविरुद्ध योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जालना तालुक्याच्या वतीने गटविकास अधिकारी पंचायत समिती जालना यांना करण्यात आली आहे.

त्यामुळे संबंधीत अधिकाऱ्यानेे योग्य कार्यवाही करावी नसता मनसे येत्या आठ दिवसांत पंचायत समिती जालना येथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल यांची नोंद प्रशासनाने घ्यावी अशी मागणी या वेळी करण्यात आली. यावेळी उपस्थित मनसे तालुका अध्यक्ष कृष्णा खलसे, ॲड. हरीदास लांडे, जिल्हाध्यक्ष विधीकक्ष, तालुका उपाध्यक्ष श्रीकांत राठोड, कृष्णा पिसोरे, महादेव भोकरे, राजु राठोड, विलास घाटे, सुरेश खांडेभराड आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...