आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदना:कॉपी पुरविणाऱ्यांवर‎ कारवाईची मागणी‎

जालना23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेवली येथे दहावी व‎ बारावीच्या परीक्षा केंद्रावर दगडफेक‎ व कर्मचारी यांना धमक्या देणाऱ्यांवर‎ कारवाई करा, अशी मागणी केंद्र‎ संचालक व सहायक केंद्र संचालक‎ यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे‎ निवेदनाद्वारे केली आहे.‎ सेवली येथील परीक्षा केंद्रावर‎ परीक्षा चालू असताना परीक्षा केंद्रा‎ बाहेरून चारही बाजूने मोठ्या‎ संख्येने लोक परीक्षार्थी यांना कॉपी‎ पुरविण्याच्या उद्देशाने जमा होतात.‎

त्यांना विरोध केला असता व त्यांनी‎ फेकलेल्या कॉप्या विद्यार्थ्यां पर्यंत‎ पोहचू न दिल्याने व पर्यवेक्षकांनी‎ कॉपी न करू दिल्याने पर्यवेक्षकांना‎ या लोकांनी कॉपी न करू दिल्यास व‎ पोलिसांत तक्रार दिल्यास जीवे‎ मारण्याच्या धमक्या देत आहेत.‎ कॉपी पुरविणाऱ्यांवर तसेच‎ कर्मचाऱ्यांावर कारवाई करावी,‎ अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना‎ देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे केली.‎

बातम्या आणखी आहेत...