आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रद्दची मागणी:शाईफेक प्रकरणात पत्रकारावर दाखल गुन्हा रद्दची मागणी

जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्याची घटना पिपंरी चिंचवड येथे घडली होती. या घटनेत शाईफेक करणाऱ्यासह वार्ताकंण करणाऱ्या पत्रकारावर दाखल गुन्हा रद्द करण्याची मागणी व्हाईस ऑफ मिडिया पत्रकार संघटनेच्यावतीने करण्यात आली. याबाबत मुख्यमंत्र्याना जिल्हाधिकाऱ्यामार्फत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिपंरी चिंचवड येथील शाईफेक घटनेचा पत्रकार समर्थन करीत नाही.

परंतु या घटनेत सदरील घटनेचे कव्हरेज करणाऱ्या पत्रकारावराचा या घटनेशी संबंध नसताना, तसेच एखाद्या घटनेचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकाराला प्रत्यक्ष घटनेवर काय घडणार याची मुळीच कल्पना नसते. अशा स्थितीत त्या पत्रकारावर ३०७ सारखा गंभीर गुन्हा नोंद करण्यात आला. हा गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष अविनाश कव्हळे, सरचिटणीस राजेश भालेराव, ज्येष्ठ पत्रकार अंकुशराव देशमुख, मकरंद जहागीरदार, रवींद्र बांगड, अहमद नूर, लियाकत अली, अर्पण गोयल, कैलास फुलारी, संतोष भुतेकर, रवी मुंडे, साहील पाटील, लहू गाढे आदींनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...