आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांना निवेदन:सेलू येथील चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी

जाफराबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी जिल्ह्यातील सेलू येथील नाभिक समाजातील ११ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी जाफराबाद येथील तालुका नाभिक समाज संघटनेच्यावतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

निवेदनात म्हटले, ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असुन या घटनेची सखोल चौकशी करावी हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे नराधमांना कठोरातील कठोर शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा द्यावी जेणे करुन समाजात अशा घटना करण्यास कुणाचीही हिमंत होणार नाही. सर्व समाजातील महिला व तरुणी सुरक्षित राहतील. शासनाने महिला व मुलींवर होत असलेल्या अत्याचाराला लगाम लावण्यासाठी कठोरातील कठोर कायदा आणुन अशा कुकर्म करणाऱ्या नराधमांना तत्काळ फाशीची शिक्षा मिळावी अशी त्या कायद्यात तरतुद करावी. अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, नाभिक समाज बांधवांनी सर्व सलुन दुकाने बंद ठेऊन या घटनेचा निषेध केला.

बातम्या आणखी आहेत...