आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावर्दीचा गैरवापर करणाऱ्या एपीआय शिवाजी नागवे यांना पोलिस खात्यातून कायमस्वरूपी बडतर्फ करा या मागणीचे निवेदन अंबड पोलिस ठाण्यात धनगर समाज बांधवांच्या वतीने देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, परतूर तालुक्यातील कोकाटे हादगाव येथील धनगर बांधवाच्या घरावर गावातील काही लोकांनी सामुहिक हल्ला करुन दगडफेक केली होती. याबाबतची तक्रार देण्यासाठी गेलेल्या अन्यायग्रस्त लोकांची फिर्याद दाखल करुन न घेता उलट त्यांनाच पोलिस कोठडीत मारहाण करत तसेच खोटे गुन्हे दाखल केले.
सदरील पीडित नागरिकांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते त्यांना न्यायालयासमोर हजर न करता चिरीमिरी घेऊन सोडून दिले. या प्रकरणाची काॅल रेकॉर्डिंग व्हायरल झाली असुन त्यात आष्टी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक शिवाजी नागवे हे फिर्यादी नागरिकांना मारहाण करीत शिवीगाळ करीत आहेत.
या व्हायरल क्लिप चे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले असुन कायदा मोडणा-या शिवाजी नागवे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात येवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावेत नसता राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याचे यशवंत सेना जिल्हाध्यक्ष बाळासाहेब तायडे यांनी सांगितले. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष बळीराम खटके,अशोक खरात,अनिल भालेकर, युवासेना उपजिल्हा प्रमुख राम लांडे, रासपचे सचिन खरात, दत्ता लोहकरे,बाबू लांडे, अशोक खरात, सैनाजी खरात, अनिल मिसाळ, रामेश्वर भोजने, सचिन लांडे, नामदेव कोल्हे, नंदू पुंड आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.