आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:महाराष्ट्रातही गोसेवा आयोग स्थापन करण्याची मागणी

जालना25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतातील गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, कर्नाटक, दिल्ली आदी राज्यांत गोशाळांचे सक्षमीकरण करण्यासाठी त्या-त्या राज्यांनी राज्य गोसेवा आयोग स्थापन केले आहे. तेथील गोशाळांना त्या-त्या राज्य सरकारने आर्थिक मदत देवुन सक्षम व परिपुर्ण बनविल्या आहेत शिवाय स्थानिक जातीच्या गोवंशाचे संवर्धन व रक्षण करण्याचे कार्य देखील ते राज्य करीत आहे. त्याच धरतीवर महाराष्ट्र सरकारनेही महाराष्ट्रात गोसेवा आयोग निर्माण करावा अशी मागणी जालना जिल्ह्यातील गोशाळा ट्रस्टी व गोसेवकांच्यावतीने करण्यात आली आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठवले आहे. महाराष्ट्र राज्यात सध्या लहान मोठ्या ९५० गोशाळा सुरु असुन या गोशाळेत वृध्द, भाकड,अपंग, अपघातग्रस्त, आजारी व अनाथ गोवंशाचे पालन पोषन व सांभाळ होत आहे. तसेच पोलिस विभागाव्दारे अवैद्य कत्तलीकरीता घेवून जातांना पकडले जाणारे गोवंश पण याच गोशाळांमध्ये रक्षण, संवर्धन व उपचाराकरीता पाठविण्यात येतात. आज जवळपास २ लाख गोवंशाचे पालन पोषण व सांभाळ या गोरक्षण संस्था कोणत्याही शासकीय मदतीशिवाय करीत आहे. या निवेदनावर संतोष औताडे, कृष्णा पठाडे, विजय कामड, कैलास बियाणी, पुसाराम मुंदडा, बन्सीधर आटोळे, पंजाब घोलप, अजय राठोड यांच्यासह आदींच्या सह्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...