आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादक्षिण मध्य रेल्वेच्या विविध मागण्या व समस्या तत्काळ सोडविण्याची मागणी भाजपा वैद्यकीय प्रकोष्ट प्रदेश समन्वयक डॉ. स्वप्नील मंत्री यांनी रेल्वे महाव्यवस्थापक अरुण जैन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी मराठवाडा रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर, जाधव आदी उपस्थित होते.
अमरावती- औरंगाबाद, नागपूर-औरंगाबाद, औरंगाबाद-जोधपूर, औरंगाबाद- सेवाग्राम -नांदेड बिकानेर इ. रेल्वे सुरू करण्यात यावी, सचखंड, नरसापूर, अजमेर, ओखा आदि सर्व सुपरफास्ट रेल्वे गाड्या परतूर (जिल्हा जालना) रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात यावा, पुर्णा अकोला रेल्वे मार्गावरील एक्स्प्रेस गाड्याना जउळका येथे थांबा देण्यात यावा, मुदखेड-मनमाड, पूर्णा-अकोला रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण लवकर पूर्ण करण्यात यावे, जंक्शन रेल्वे स्टेशन पर दोन रेल्वे मध्ये कनेक्टिंग ठेवण्यात यावी, तत्काळ तिकिटासाठी टोकन सिस्टम सुरू करावी, जालना-खामगाव व रोटेगाव-पुणतांबा रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण करून काम लवकर सुरू करण्यात यावे, आदी मागण्यांचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.