आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोर्चा:शासकीय योजनांच्या रकमेत वाढ करण्याची मागणी

जालना3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे. तसेच शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या रक्कमेमध्ये वाढ करण्यात यावी, यासह इतर मागण्यांचे निवेदन रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली. मागण्या पुर्ण न झाल्यास २८ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

निवेदनात म्हटले, रमाई व प्रधानमंत्री आवास योजनेचे जे १ लाख ३८ हजार रुपये मिळते. ते अत्यंत तुटपुंजे आहे. त्यात सर्वसामान्य माणसाला घर बांधता येत नाही. परिणामी, त्याला कर्ज काढावे लागते. त्यामुळे शासनाने ग्रामीण भागासाठी यात वाढ करुन २ लाख ५० हजार रुपये तर शहरी भागासाठी ३ लाख रुपये अनुदान द्यावे, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी मिळणाऱ्या विहिरींना काही गावात भूजल सर्वेक्षण विभागाकडून पाणी पातळी कमी असल्याचे कारण पुढे करुन आडकाठी करण्यात येते.

त्यामुळे मागासवर्गीयांच्या बागयतदार होण्याच्या स्वप्नाला तिलांजली देण्याचे काम हा विभाग करीत आहे. त्यामुळे ही अट रद्द करावी. गायरान जमिनी कसरणाऱ्या कास्तकऱ्यांच्या नावे सातबारा देण्यात याव्यात. संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेची जाचक अटी रद्द करून लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा. अशा अन्य मागण्यांसाठी रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार व प्रदेशाध्यक्ष सागर डबरासे यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष लिंबाजी वाहुळकर, पुर्व जिल्हाध्यक्ष दिनेश आदमाने यांच्या मार्गदर्शनाखाली धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. निवेदनावर चंद्रकांत खरात, मच्छिंद्र खरात, सर्जेराव अंभोरे, सुरेश वानखेडे, अरूण म्हस्के, दादाराव काकडे, शुभम हिवराळे, भिमराज खरात, नवनाथ ठोके, मधुकर म्हस्के, कैलास उघडे, जयपाल भालके, गोरख आपुट, गौतम पानवाले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...