आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:डाक सेवकांना पेन्शन देण्याची मागणी; भाजप वैद्यकीय प्रकोष्टचे प्रदेश समन्वयक डॉ. मंत्री यांचे पंतप्रधानांना निवेदन

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटिश काळापासून सुरू असलेल्या डाक विभागातील व्यवस्थेतील त्रुटी दूर करून डाक सेवकांना पेन्शन लागू करा व शाखा डाकघर ग्रामीण भागातील जनतेसाठी दिवसभर खूली ठेवा अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी व संचार मंत्री अश्विनी वैष्णव यांचेकडे भाजप वैद्यकीय प्रकोष्टचे प्रदेश समन्वयक डॉ. स्वप्नील मंत्री यांनी केली आहे.

ग्रामीण भागातील जनतेला शहरी भागाप्रमाणे सुविधा मिळाव्या म्हणून आत्मनिर्भर भारतात १२९०००० शाखा डाकघरामध्ये २ लाख ६० हजार साठ हजार ग्रामीण डाकसेवकांच्या माध्यमातून ग्रामीण जनतेला डाक विभागच्या आम योजनेचा प्रसार व प्रचार सर्व सुविधा सेवा दिली जात आहे. ग्रामीण क्षेत्रातील शाखा डाकघरे ही डाक विभागाच्या इमारतीचा पाया परंतु ग्रामीण भागात शाखा डाकघर चार पाच घंटे उघडी असतात. शहरी पोस्ट ऑफिस आठ घंटे उघडे असते. त्यामुळे शहरी जनतेला आठ घंटे सुविधा मिळते. डाक विभागात ग्रामीण क्षेत्र शाखा डाकघर विभागाची जड़ आहे.

परंतु ग्रामीण डाकघर दिवसभर उघडी राहत नसल्याने ग्रामीण आम जनतेला व ग्राहकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण व शहरी मध्ये भेदभाव न ठेवता समान कायदा करावा. ब्रिटिश काळापासून सुरू असलेल्या डाक सेवकाच्या वयाचे ६५ वर्षापर्यंत सेवा ही वयाची ६० वर्षापर्यंत करण्यात यावी, ग्रामीण डाक सेवकांना समाविष्ट करण्यासाठी अडचण ठरलेला ग्रामीण डाक आचरण नियम ३ ए ला समाप्त करून ग्रामीण डाकसेवकाना पेन्शन सुविधा देण्यात यावी, अशी मागणी डॉ. मंत्री यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...