आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:आन्वा-पानवडोद रस्ता दुरुस्त करण्याची मागणी; विधान परिषद आमदार अंबादास दानवे यांचेकडे मनोज वडगावकर यांनी केली मागणी

आन्वा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील आन्वा ते पानवडोद या पाच किलोमीटरच्या मुख्य रस्त्याची मागील काही वर्षांपासून दुरवस्था झाल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. या रस्त्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी विधान परिषद आमदार अंबादास दानवे यांचेकडे मनोज वडगावकर यांनी केली आहे..

निवेदनात म्हटले, आन्वा हे ऐतिहासिक गाव व मंदिराची नगरी अशी ओळख असलेल्या या गावात मोठमोठ्या शैक्षणिक संस्था, आजुबाईचे मंदिर, हेमांडपंथी महादेव मंदिर व अरबी मदरसा सारख्या वास्तु असल्याने येथे राज्यभरातील भावीक इतिहासप्रेमी व विद्यार्थ्यांची नेहमी वर्दळ पाहायला मिळते. परंतु या सर्वांना खराब झालेल्या याच मुख्य रस्त्यावरून त्रासदायक प्रवास करीत या गावात ये-जा करावी लागते. गेल्या अनेक दिवसापासुन रत्यावरील डांबर व खडी उखडल्यामुळे जागो जागी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. अशा रस्त्यातुन वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते.

खराब रस्त्यामुळे अनेकदा छोटे मोठे अपघातही झालेले आहेत. रस्ता दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी संबधित विभागाकडे वारंवार मागणी केलेली आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आमदार अंबादास दानवे यांनी याकामी स्वतः लक्ष देऊन रस्ताचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी वडगावकर यांनी केली आहे. दरम्यान, सामान्य नागरिकांच्या प्रश्नांची सोडवण्यासाठी शिवसेना सदैव तत्पर असते, त्यामुळे आन्वा ते पानवडोद या रस्ता संदर्भात संबंधित अधिकारी यांच्याकडून सर्व माहिती घेऊन या रस्त्याचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले.

बातम्या आणखी आहेत...