आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:जळालेले रोहित्र  बदलून देण्याची मागणी

मंठा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तळणी फाट्यावरील विद्युत रोहित्र गेल्या चार महिन्यांपासून जळाले आहे. सदरील रोहित्र बदलून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.सदरील निवेदन उप अभियंता एम.एस.भावसार यांनी स्वीकारले.

मंठा येथील तळणी फाट्यावरील रोहित्र गेल्या चार महिन्यापासून जळाले असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाली आहे. याप्रकरणी शेतकरी वारंवार महावितरण कार्यालयाला खेट्या घालत आहेत.सध्या रब्बी हंगामातील पिकांसह यासह रब्बी हंगामातील पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांची शेतीकामे रखडली आहेत. या पार्श्वभूमीवर विद्युत रोहित्र ता्काळ बदलून देण्यात यावे, नसता उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी दिला आहे. या निवेदनावर सुमन बोडखे, काशीबाई काकडे , दत्तात्रय अंभोरे, बाबासाहेब बोराडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...