आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी‎:नगरेश्वर रस्त्यावरील धोकादायक‎ विजेचा खांब बदलण्याची मागणी‎

सेलू24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील वालुर येथील वार्ड क्रमांक ६ या‎ नगरेश्वर गल्लीमध्ये नगरेश्वर मंदिर रस्त्यावर‎ असलेल्या धोकादायक विजेचा खांब बदलण्याची‎ मागणी ग्रामस्थांनी सेलु वीज वितरणचे उपअभियंता‎ दशरथे तेलंगरे यांच्याकडे सोमवार ६ मार्च रोजी‎ लेखी निवेदनाद्वारे केली आहे. तालुक्यातील वालूर‎ येथील नगरेश्वर मंदिर रस्त्यावर असलेल्या वार्ड‎ क्रमांक ६ मधील नगरेश्वर गल्लीत विजेता खांब‎ धोकादायक असल्याची माहिती परिसरातील‎ रहिवाशांनी वालूर येथील वीज वितरणचे कनिष्ठ‎ अभियंता, स्थानिक कर्मचारी यांना अनेकदा भेटून या‎ गंभीर प्रकाराची माहिती दिली आहे.

परंतु‎ संबंधितांकडून दुर्लक्ष होत आहे. भविष्यात या‎ विजेच्या खांबामुळे कुठलीही जीवित हानी अथवा‎ आर्थिक नुकसान झाल्यास त्यास वीज वितरण‎ जबाबदार राहील असेही निवेदनात नमूद करण्यात‎ आले आहे. सोमवार ६ मार्च रोजी वीज वितरणचे‎ उपअभियंता दशरथ तेलंगरे यांना दिले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...