आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:फळबागा नुकसानीचे पंचनामे करून अनुदान देण्याची मागणी

परतूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे परतूर आणि परिसरातील मोसंबी फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोसंबीच्या अंबिया बहरातील फळांचे ६० ते ८० टक्के एवढे नुकसान झाले आहे. मृग बहाराची ७० ते १०० टक्के फळगळती झाली आहे. मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांच्या फळबागांचे पंचनामे करून त्यांना अनुदान देण्यात यावे अशी मागणी परतूर परिसरातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांच्या माध्यमातून सदरील मागणीचे निवेदन पाठविण्यात आले आहे. गावातील तलाठी, कृषी सहायक यांच्याकडे वेळोवेळी पंचनामे करण्याची मागणी करूनही शासनाच्या सूचना नसल्याने पंचनामे करता येत नसल्याचे त्यांच्याकडून सांगितले जाते. तालूक्यातील अनेक तलाठी आणि बहुतांश कृषि सहायक मुख्यालयी न राहता बाहेर गावावरून अपडाऊन करत आहेत.अनेक अडचणीच्या कळात हे कर्मचारी गावात उपस्थित नसल्याने गावकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. कृषिविभाग चालढकल करत असल्याने कृषि विभागाच्या बाबतीत कडक भूमिका घेण्यात यावी अशी मागणी अभय काळुंके, विठ्ठल पवार, राजेश भापकर, किशोर जगताप, मदन भापकर, दत्ता काळुंके, उद्धव गावडे, संदीप केवारे, राजेश मातने, केशव कदम, वसंत भापकर, रामजी धस, विशाल पवार, चेतन चिखले, संतोष झरड, अनिल गुजर, लक्ष्मण काळुंके आदींनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...