आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:नगरपालिकेने रोगराईने ग्रस्त मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

जालना4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील प्रत्येक वॉर्डात २० ते २५ कुत्रे रोगराईने त्रस्त असून मोकाट फिरत आहेत. मोटारसायकलवर जाणारे, पाई फिरणारे, सकाळी सकाळी दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी गल्लीबोळात दुकानांवर जाणारे लहान मुले व मुली यांच्यावर ही कुत्रे हल्ला करीत आहेत. या कुत्र्यांचा नगरपालिकेने बंदोबस्त करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरेश सदगुरे यांनी केली आहे.

नगरपालिकेत दिलेल्या निवेदनात म्हटले, जालना शहराच्या सीमावर्ती भागात दुसऱ्या गावातील लोक १०० ते १५० कुत्री सोडून जात असल्याचे ही पाहावयास मिळत आहे. सदरील कुत्री ही रोगराईग्रस्त असून झुंडीने फिरतात. फुले मार्केट, अलंकार टॉकीज, गवळीपुरा, खडकपुरा, कबाडी मोहल्ला, पोलास गल्ली, बरबार गल्ली, रहेमान गंज, देऊळगावराजा रोड, सिंधी मंदिर, उतार गल्ली, दर्गाबेस, रामनगर, पोलिस कॉलनी, बागवान गल्ली आदी ठिकाणी या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली.

बातम्या आणखी आहेत...