आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिक:महावितरणने शेतीसाठी वेळेत वीजपुरवठा करण्याची मागणी ; आंदोलन करण्याचा इशारा

माहोरा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील पंधरा ते वीस दिवसांपासून वालसा वडाळा परिसरात पाऊस नसल्याने पिकांनी माना टाकल्या आहेत. विहीरीत असलेले पाणी पिकांना देण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांचा सुरू असताना महावितरणकडून विजपुरवठा पाहिजे तसा दिला जात नाही. यामुळे शेतीला पाणी देण्याची गरज लक्षात घेता महावितरणकडून सुरळीत विजपुरवठा द्या. अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा वालसा वडाळा येथील शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदनातून दिला आहे.

खरिपाची पिके चांगल्या प्रकारे बहरात असताना वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे मात्र शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या पिकांना फटका बसण्याची भीती असून जे काही तास थ्री फिज लाईन साठी ठरवून दिलेत त्या वेळापत्रकाप्रमाणे कधीच लाईन टिकत नाही. शेतकरी पिकांना पाणी उपलब्ध असूनही देता येत नसल्याकारणाने हवालदिल झाला आहे. शक्य झाल्यास दिवसा थ्री फिज सप्लाय सुरळीत ठेवावा अशी मागणी वडाळा येथील शेतकऱ्यांनी सहाय्यक अभियंता यांना निवेदनाद्वारे केली आहे. शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार झाला नाही तर शेतकऱ्यांच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा वडाळा येथील शेतकऱ्यांनी दिला. या निवेदनावर अनंता सोळंके, भाऊसाहेब भालेकर, प्रल्हाद शेजोळ, विठ्ठल दळवी, अनिल सोळंके, संजय आव्हाड, समाधान सोळंके, कृष्णा सोळंके आदींच्या स्वाक्षऱ्या आहे.

बातम्या आणखी आहेत...