आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी‎:शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या‎ मदतीची रक्कम खात्यावर‎ जमा करण्याची मागणी‎

शेलूद‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील शेलूद व‎ परिसरात मागील सप्टेंबर,‎ ऑक्टोबर महिन्यांत अतिवृष्टी‎ झाली. यात शेतकऱ्यांच्या‎ जमीनीमध्ये पाणी साठल्यामुळे‎ पिकाचे मोठे नुकसान झाले.‎ त्यावेळी तलाठी, मंडळ अधिकारी,‎ कृषी सहाय्यक, ग्रामसेवकांनी‎ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन‎ पंचनामे केले. परंतु शेतकऱ्यांच्या‎ खात्यात अद्याप दुष्काळी मदत‎ आलेली नाही.

शेतकरी‎ अतिवृष्टीच्या मदतीची रोज प्रतिक्षा‎ करीत आहेत. खात्यात रक्कम‎ जमा न झाल्याने शेतकरी‎ अडचणीत सापडला आहे.‎ शेलुदसह परिसरात सोयाबीन व‎ कपाशी हे मुख्य पीक आहे. या‎ पिकाचे अतिवष्टीने मोठ्या‎ प्रमाणात नुकसान झाले आहे.‎

तसेच विम्याची रक्कम‎ शेतकऱ्याकडून घेण्यात आली.‎ मात्र, जेवढा विमा भरला तेवढी‎ रक्कमसुद्धा काही शेतकऱ्यांना‎ विमा कंपनीकडून देण्यात आली‎ नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची‎ एकप्रकारे थट्टाच केली जात आहे.‎ संबधितांनी लक्ष देऊन रक्कम‎ तत्काळ खात्यावर जमा करण्याची‎ मागणी होत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...