आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:वडीगोद्री मंडळातील संपूर्ण क्षेत्राचा अनुदानात समावेश करण्याची मागणी

वडीगोद्रीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड तालुक्यातील वडीगोद्री महसूल मंडळात सततच्या पावसाने व परतीच्या पावसामुळे बाधित पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले. तरी ही या मंडळातील ५० टक्के क्षेत्र अनुदानातून वगळण्यात येत आहे. वडीगोद्री मंडळातील संपूर्ण क्षेत्राचा अनुदानामध्ये समावेश करण्याच्या सूचना संबंधितांना द्याव्यात अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्तांकडे निवेनाद्वारे केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त जगदीश मणियार यांना शुक्रवारी निवेदन दिले. वडीगोद्री महसूल मंडळांमध्ये सततचा पाऊस व परतीच्या पावसामुळे फळबागांची फळगळ होऊन मोठे नुकसान झाले आहे. तर खरीप पिकांचे प्रचंड त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

मात्र या नुकसान भरपाई अहवाल सादर करण्यासाठी वडीगोद्री महसूल मंडळातील एकूण क्षेत्रापैकी ५० टक्के क्षेत्र ग्राह्य धरण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. या मंडळात सरासरीच्या दुप्पट पाऊस पडला असतानाही नुकसान भरपाई मध्ये निम्मे क्षेत्र विचारात घेतले जात आहे हे अन्यायकारक आहे. महावेध या संस्थेच्या पर्जन्यमापनाच्या अहवालात वडीगोद्री मंडळात अतिवृष्टीची नोंदी नसल्याकारणाने अनुदानात या मंडळातील ५० टक्के क्षेत्रास नुकसान भरपाई मिळणार आहे. मात्र अतिवृष्टीने जसे नुकसान झाले तसेच नुकसान सततच्या व परतीच्या पावसामुळे शेतशिवार जलसंचीत होऊन मोठया प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. दीड दोन महिन्यात सतत पावसामुळे या महसूल मंडळात खरीप पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. आयुक्तांनी याबाबत जिल्हा प्रशासनास पुनर अहवाल सादर करण्याचे आदेश द्यावेत. इतर मंडळाप्रमाणे पूर्ण नुकसानीच्या अहवालामध्ये समावेश करावा.

जेणेकरून आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासकीय मदतीचा लाभ मिळून रब्बी पिकांच्या पेरण्यासाठी आर्थिक मदत मिळेल अशी मागणी करण्यात आली. या निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे, पांडूरंग गावडे, अंकुश तारख, भारत उंडे, अरुण बांगर व युवराज गावडे आदींच्या सह्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...