आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी‎:शेतकऱ्यांना पीएम किसान‎ योजनेचा लाभ देण्याची मागणी‎

भोकरदन‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जालना जिल्ह्यातील शेतकरी‎ पीएम किसान योजनेच्या‎ लाभापासून वंचित आहे.‎ ऑनलाईन साईट गेल्या तीन‎ वर्षांपासून बंद असल्याने नवीन‎ नोंदणी होत नाही. तसेच अनेक‎ लाभार्थींना अडचणी येत‎ आहे.त्यामुळे तत्काळ पीएम‎ किसान योजनेचा लाभ वंचित‎ असलेल्या शेतकऱ्यांना देण्यात‎ यावा, अशी मागणी केली जात‎ आहे.‎ विभागीय आयुक्तांना दिलेल्या‎ निवेदनात म्हटले आहे, यावर्षी‎ परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या‎ हातातोंडाशी आलेला घास‎ हिरावून घेतल्यामुळे शेतकरी‎ आर्थिक अडचणीत सापडले‎ आहेत. त्यातच नुकसानीची मदत‎ अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली‎ नाही.

तसेच राष्ट्रीयकृत बँकांनी‎ पण खरीप हंगाम संपला मात्र‎ अद्यापही भोकरदन तालुक्यातील‎ शेतकऱ्यांना पिक कर्ज दिले नाही.‎ यामध्ये शेतकऱ्यांनी उसनवारी‎ करून तसेच सावकारी कर्ज‎ काढून पेरणी केली. त्यातच‎ कापसाचे भाव ही घसरल्याने‎ सगळीकडूनच शेतकरी आर्थिक‎ विवंचनेत सापडला आहे. त्यामुळे‎ शासनाने याचा गांभीर्याने विचार‎ करून या वर्षीचा शेतसारा वसूल‎ करू नये, अशी मागणी बळीराजा‎ फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण‎ लोखंडे यांच्यासह परिसरातील‎ शेतकऱ्यांनी केली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...