आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:वाहतुकीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी‎

जालना‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरामध्ये चिल्लर माल वाहतूक‎ ट्रान्सपोर्टींग जागा उपलब्ध करून‎ देण्यात यावी अशी मागणी चिल्लर‎ माल वाहतूक ट्रान्सपोर्टींग‎ संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी‎ डॉ. विजय राठोड, आ. कैलास‎ गोरंट्याल यांना देण्यात आलेल्या‎ निवेदनाद्वारे केली आहे.‎ निवेदनात म्हटले आहे की,‎ जालना शहरामध्ये चिल्लर माल वाहतूकीसाठी ट्रान्सपोर्ट नगर नसल्यामुळे व अधिकृत जागा नसल्याने शहरामध्ये असणाऱ्या ट्रान्सपोर्टमुळे वाहतूकीस अडथळा ‎निर्माण होत आहे.

तसेच पोलीस ‎देखील छोट्या-मोठ्या ‎गाडयावाल्यांना ऑनलाईन पावती ‎देतात. चिल्लर माल वाहतूक ‎करणाऱ्यांसह व्यापाऱ्यांना या सर्व समस्यांचा समाना करावा लागत असल्यामुळे जालना शहराबाहेर‎ अधिकृत माल वाहतूक‎ ट्रान्सपोर्टींग जागा तात्काळ‎ उपलब्ध करून द्यावी अशी‎ मागणी चिल्लर माल वाहतूक‎ ट्रान्सपोर्टींग संगघटनेचे अध्यक्ष‎ सुरेश दाभाडे, शेख अनवर, शेख‎ अफसर, जगदिश सुरी, मनोज‎ कपूर, युसूफ खान, सुरेश मुळे‎ यांच्यासह आदींनी या निवेदनाद्वारे‎ केली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...