आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:बससेवा सुरु करण्याची मागणी ; परिसरातील ग्रामीण प्रवाशांची होत आहे गैरसोय

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राजुर-दाभाडी-फुलंब्री मार्गे जालना-औरंगाबाद-ही पुर्वी पासून चालु असलेली एस.टी.बससेवा महामंडळाने बंद केली असून ती पुर्ववत सुरु करावी अशी मागणी भाजपा जिल्हा प्रसिध्दी प्रमुख बाबासाहेब पाटील कोलते यांनी मा. जिल्हाधिकारी,जालना व विभाग नियंत्रक,राज्यपरीवहन महामंडळ, जालना यांना एका निवेदनद्वारे केली आहे. २०१४ पुर्वी जालना-औरंगाबाद ही राजुर दाभाडी फुलंब्री मार्गे ही एस.टी.बससेवा सुरु होती परंतु अचानक कुठलेही कारण न दाखविता जालना आगाराने सदर एस.टी.बससेवा बंद केली आहे. यामुळे परिसरातील ग्रामीण प्रवाशांची गैरसोय होत आहे. सदर बस पूर्ववत सुरु करावी, अशी मागणी कोलते यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...