आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकांचे निवेदन:शासकीय शिक्षकांचे अपडाऊन थांबवण्याची मागणी

आष्टीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांच्या अपडाऊनमुळे शैक्षणिक व इतर कामे खोळंबली असल्याने त्यांचे अपडाऊन बंद करण्याची मागणी आष्टी व परिसरातील पालक व शिक्षणप्रेमींनी शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश ढवळे यांच्यामार्फत शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे, शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी यांच्यासह सर्वच क्षेत्रातील शासकीय अधिकारी व कर्मचारी नेमणूक केलेल्या ठिकाणी न रहाता त्यांच्या सोयीनुसार शहरी भागातून अपडाऊन करीत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच इतर सर्व कामे खोळंबली आहेत. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात गंगापुरचे आमदार प्रशांत बंब यांनी वरील मुद्द्यावर सविस्तर माहिती देऊन अपडाऊन बंद करण्याची मागणी केली असता राज्यभरातील शिक्षक त्यांच्यावर असंविधानिक दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचा निवेदनात निषेध करण्यात आला आहे.

तसेच आमदार बंब यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. शिक्षक व शासकीय कर्मचाऱ्यांचे अपडाऊन बंद करून कार्यस्थळी न राहिल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा बाबुराव गोसावी, हाजी रहेमत पठाण, मारोती जाधव, मधुकर मोरे, आनंदा आगलावे, नसरूल्ला खा पठाण, जावेद टेलर, सुलतान पठाण, बालासाहेब सांगुते, फेरोज बागवान यांच्यासह आदींनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...