आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:दहा हजार सभासद असलेल्या शेतकऱ्यांची कामधेनू वाचवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दहा हजार सभासद असलेल्या शेतकऱ्यांची कामधेनू असलेल्या जालना सहकारी साखर कारखाना वाचवावा, अशी मागणी जालना सहकारी साखर कारखाना शेतकरी, कामगार बचाव समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

वर्ष २०१२ मध्ये राज्य सहकारी बँकेने कारखाना हस्तांतर करतेवेळी कारखान्याकडील थकीत देणे, कामगारांचे वेतन, पीएफ, ग्रॅज्युटी देण्याची अट केली आहे. मात्र, अद्याप यावर कार्यवाही झाली नाही. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणीही समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. या निवेदनावर आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासह ज्ञानेश्वर भांदरगे, अरूण वझरकर, प्रल्हाद हेकाडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...