आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिन रद्द:ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता असल्याने लोकशाही दिन रद्द

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकान्वये जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन महिन्याच्या पहिल्या सोमवारी करण्याचे निर्देश आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांनी निवडणूका असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून निवडणूकीचा निकाल जाहिर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहणार असल्याचे कळविले आहे.

तरी सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकान्वये ज्या क्षेत्रामध्ये निवडणूकीकरिता आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे अशा ठिकाणी त्या स्तरावरील लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येवू नये असे नमूद केले आहे. तरी सोमवार ५ डिसेंबर रोजी आयोजित लोकशाही दिन घेण्यात येणार नाही, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य) शर्मिला भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातम्या आणखी आहेत...