आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निदर्शने‎:परतूरमध्ये वीज कर्मचाऱ्यांची निदर्शने‎

परतूर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महावितरणसह इतर तीन कंपन्यामधील मधील‎ कर्मचारी, अधिकारी वीज वितरणाच्या समांतर‎ परवाना आणि खासगी करणाविरोधात मंगळवारी‎ मध्यरात्री पासून संपावर गेले होते. बुधवारी‎ सकाळी महावितरणच्या उपविभागीय‎ कार्यालयासमोर वीज कंपन्यांच्या कर्मचारी,‎ अधिकाऱ्यांनी सरकार विरोधात निदर्शने करत‎ घोषणा बाजी केली.‎

या संपामध्ये वीज कर्मचारी अधिकारी अभियंते‎ बाह्य कंत्राटी कामगार तसेच संघटनाचे‎ पदाधिकारी एन.व्ही बेंडाळे,मंगेश रामटेके, निलेश‎ दरेकर, रमेश आढाव, विशाल यंदे,‎ जी.ए.चंदेल,पी.एस.गणे र,आर. डी.वायाळ,‎ गुलाम यासीन,सुभाष कांबळे, नौशाद काजी,‎ वाहेद काजी इतर महिला कर्मचारी तसेच सर्व‎ विजकर्मचारी अभियंता अधिकारी बाह्यकंत्राटी‎ कामगार संपूर्ण संपामध्ये सहभागी झाले होते.

संपा‎ दरम्यान सकाळी ११ वाजेपासून शकतील विद्युत‎ पुरवठा खंडित झाला होता. सकाळी ११ ते‎ सायंकाळी ६ दरम्यानच्या ७ तास शहरातील सर्व‎ भागातील विद्युत पुरवठा खंडित असल्याने‎ नागरिक, व्यापाऱ्यांना अडचणींचा सामना करावा‎ लागला. दरम्यान सायंकाळी पाच वाजेच्या‎ सुमारास संघटनेच्या वतीने सरकार सोबत झालेली‎ बोलणी यशस्वी झाल्याने संप मागे घेण्यात‎ आल्याचे संघटनाच्या वतीने सांगण्यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...