आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी घनसावंगीत किसान सभेची निदर्शने

वडीगोद्री2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • जिल्हाधिकारी विजय राठोड यांच्याशी किसान सभा शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा

घनसावंगी येथे बुधवारी तालुक्यातील अतिरिक्त उसप्रश्न, विजप्रश्न आणि पीकविमा तसेच इतर ज्वलंत प्रश्नांसाठी अखिल भारतीय किसान सभा घनसावंगी तालुका कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले.

संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला. या घोषणांनी परिसर दणाणून निघाला. यावेळी जिल्हाधिकारी विजय राठोड हे घनसावंगी दौऱ्यावर असताना त्यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी अतिरिक्त उसप्रश्न, प्रलंबित पीक विमा आणि वीज बिल प्रश्न सोडवण्यासाठी शिष्ट मंडळासोबत सकारात्मक चर्चा करुन सर्व मागण्यांची लवकरच सोडवणूक करू, असे आश्वासन दिले. या आंदोलनात किसान सभेचे जिल्हाध्यक्ष गोविंद आर्दड यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सरकारवर टीका केली. किसान सभा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बाजूने नेहमी लढणार आणि यांना न्याय मिळवून देणार, असे सांगितले. यावेळी किसान सभेचे तालुका अध्यक्ष अंशीराम गणगे, तालुका सचिव वैभव कराळे, एसएफआयचे अजित पंडित, आसाराम आर्दड, बालासाहेब राऊत, बजरंग तौर, जनार्दन भोरे, कुलदीप आर्दड, ज्ञानेश्वर लहाने, अप्पासाहेब काकडे, अमोल काळे यांच्यासह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अंशीराम गणगे, अजित पंडीत यांनी मनोगत व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...