आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निदर्शने:राज्यपाल कोश्यारी यांच्याविरोधात विरेगाव येथे मनसेच्या वतीने निदर्शने

सिंधीकाळेगाव7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा विषयी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जालना तालूक्यातील विरेगाव येथे तालुकाध्यक्ष कृष्णा खलसे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार दिलीप धोत्रे मनसे नेते, प्रकाश महाजन प्रवक्ते महाराष्ट्र राज्य, संतोष नागरगोजे सरचिटणीस, अशोक तावरे राज्य उपाध्यक्ष, सतेनाम गुल्हाटी राज्य उपाध्यक्ष, गजानन भाऊ गिते जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यपाल यांचा निषेध नोंदवण्याकरीता विरेगाव येथे मंगळवारी आंदोलन करण्यात आले.

यावेळी विधी कक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. हरीदास लांडे, श्रीकांत राठोड, कृष्णा पिसोरे, राम कातकडे, महादेव भोकरे, ऋषिकेश कावळे, सुनील चव्हाण, बाळासाहेब जाधव, अनिल जाधव, शिवाजी जाधव, गणेश बाहेरकर, गणेश जाधव, राम गुंजाळ, रामेश्वर जाधव, मचिंद्र राठोड, शरद जाधव, गोवर्धन जाधव, बालासाहेब जाधव, आकाश खरात, बालासाहेब देवडे, विलास घाटे, दिपक राऊत, कृष्णा काटकर, जिवा जाधव आंदोलनात सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...