आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबीर:सरस्वती विद्या मंदिरात‎ 300 जणांची दंत तपासणी

भोकरदन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील शेलुद‎ येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेत‎ मंगळवारी डॉ. आशिष खासबागे‎ यांचे उपस्थितीत विद्यार्थ्यांसाठी‎ दंतचिकित्सा शिबीर आयोजित‎ करण्यात आले होते. यात विद्यार्थी‎ १८० तर विद्यार्थीनी १२० अशी एकुण‎ ३०० जणांची दंत तपासणी करण्यात‎ आली.

यावेळी आपल्या दातांची‎ काळजी कशी घ्यावी याबाबत डॉ.‎ खासबागे यांनी मार्गदर्शन केले.‎ यावेळी टूथपेस्ट भेटवस्तू देण्यात‎ आली. कार्यक्रमाला प्राचार्य आर.‎ एन. वाघ, डी. व्हि. चव्हाण, टि.‎ आर. पडोळ, के. डी. साळवे, व्हि.‎ एस. खरात, एस. डी. मुठ्ठे, ए. बी.‎ अल्हाट, एस. डी. जगताप आदी‎ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...