आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइन्नरव्हील क्लब ऑफ जालनातर्फे जालना शहर तसेच ग्रामीण विभागातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची दंत तपासणी उपक्रम हाती घेण्यात आलेला असून, ऑगस्ट ते नोव्हेंबर असे ३ महिन्यात १० हजार विद्यार्थ्यांची दंत तपासणी करून उद्दिष्टपूर्ती करण्यात आली आहे. यानंतरही आम्ही न पोहचलेल्या काही शाळांमध्ये मोफत तपासणी शिबिरे घेण्यात येतील, अशी माहिती क्लबच्या अध्यक्ष स्मिता चेचाणी यांनी दिली.
हजारोच्या संख्येने विद्यार्थी असलेल्या एम. एस. जैन इंग्लिश स्कूल, सरस्वती भवन विद्यालय, हिंदी हिंदी विद्यालय, शांतिनिकेतन विद्यामंदिर आदी १० शाळांमध्ये मोफत दंत तपासणी शिबिरे सातत्याने घेण्यात आली. त्यातल्या शाळेमधील प्रत्येक विद्यार्थी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची दंत तपासणी करण्यात येऊन, दंतविकार आढळलेल्या विद्यार्थ्यांना करावयाच्या उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच काय विद्यार्थ्यांवर सवलतीच्या दरात उपचार करण्यात आले.
या उपक्रमात क्लबच्या वैद्यकीय संचालक तथा दंत रोग तज्ञ डॉ. रश्मी अग्रवाल, डॉ. नितीन खंडेलवाल, डॉ. विभा लाहोटी, डॉ. गौरी राका, डॉ. टेकवाणी, डॉक्टर सीमा झंवर व त्यांच्या सहकाऱ्यांनी दंत तपासणी केली. ठीकठिकाणाच्या दंत तपासणी शिबिरात मार्गदर्शन करताना डॉ. रश्मी अग्रवाल म्हणाल्या की, ग्रामीणच्या तुलनेत शरीरातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये दंतविकाराचे प्रमाण सर्वाधिक आढळून येत आहे. दंतविकार जडू नयेत म्हणून विद्यार्थ्यांनी फळे आणि प्रोटीनयुक्त पदार्थ खाण्यावर विशेष भर द्यावा. जंक फूड खाणे टाळता येत नसेल तर 8 दिवसातून एक दिवस ते खावे, व्यवस्थित ब्रश करावा, असे सांगून त्यांनी दंतविकार टाळण्यासाठी आहार कसा घ्यावा, यावर मार्गदर्शन केले. क्लब अध्यक्ष स्मिता चेचाणी म्हणाल्या की, सलग तीन महिने वेगवेगळ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची दंत तपासणी शिबिरे घेण्यात आली. सर्वांच्या सहकार्यामुळे हा प्रकल्प अप्रतिम ठरला आहे.
दात चांगले असतील तर खाल्लेले अन्न चांगले चर्वण करता येते. परिणामी, पचनक्रिया चांगली राहते. दात व्यवस्थित असतील तर चेहराही फुलून दिसतो. शिबीराच्या यशस्वीतेसाठी क्लबच्या अध्यक्ष स्मिता चेचाणी, सचिव स्वाती कुलकर्णी, सुनिता अग्रवाल, डॉ. रश्मी अग्रवाल, डॉ. सुमित्रा गादिया, शीला रायठठ्ठा व क्लबने परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.