आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:प्रियदर्शनी बँक खातेदारांच्या खात्यात पीएम किसान योजनेची सव्वादोन कोटी रक्कम जमा

जालना23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हामधील प्रियदर्शनी नागरी सहकारी बँकेच्या जालना, रामनगर, राजुर, कुंभार पिंपळगाव आणि तिर्थपुरी शाखेमधील खातेदारांच्या खात्यांमध्ये पीएम किसान योजने अंतर्गत एकूण ११३०० खातेदारांच्या खात्यांमध्ये २ कोटी २६ लाख ६ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत.

बँकेच्या शेतकरी खातेदारांनी वेळीच आपल्या खात्यांची केवासी पुर्ण केलेली असल्याने, सदरील रक्कम आधार क्रमांकानुसार बँकेस प्राप्त झालेली आहे. सदरील रक्कम प्राप्त होताच, त्वरीत बँकेचे अधिकारी, कर्मचारी यांनी पीएम. किसान योजचेची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केलेली आहे. जिल्हामधील सर्व प्रथम शेतकऱ्यांच्या खात्यांतध्ये त्वरीत रक्कम जमा करणारी प्रियदर्शनी प्रथम बँक आहे. बँकेचे खातेदार सदरील रककम एटीएम, पॉझ, फोन पे, गुगल पे, युपीआय, ऑनलाइन स्वरुपात किंवा सेल्फ विड्राल वरुन रक्कम काढून घेत आहेत. पीएम किसान या योजनेची रक्कम पेरणीच्या वेळेस प्राप्त झालेली असल्याने, शेतकरी वर्ग यांच्या शेतीमधील मशागती कामकाजासाठी, तसेच वि. बियाणे खरेदी करणेसाठी वेळेवर रक्कम उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...