आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन‎:अतिवृष्टीचे अनुदान‎ खात्यावर जमा करा‎

परतूर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे‎ शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले‎ आहे.अडचणीत सापडलेल्या‎ शेतकऱ्याला शासनाने अनुदान‎ जाहीर केले. मात्र, हे अनुदान‎ अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना मिळालेले‎ नाही. शेतकऱ्यांचे अतिवृष्टीचे‎ अनुदान तातडीने त्यांच्या खात्यावर‎ जमा करावे, अशी मागणी‎ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या‎ परतूर शाखेच्या वतीने करण्यात‎ आली आहे. याबाबत शुक्रवारी‎ परतूरच्या उपविभागीय‎ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले‎ आहे.‎ शासनाने अतिवृष्टी झाल्यानंतर‎ तातडीने अनुदान शेतकऱ्यांच्या‎ खात्यात जमा केले जाणार‎ असल्याची घोषणा केली होती.‎

शासनाच्या घोषणेला सहा‎ महिन्यांचा कालावधी उलटला तरी‎ अद्याप अनुदान शेतकऱ्यांना‎ मिळालेले नाही. दसरा, दिवाळी हे‎ मोठे सण शेतकऱ्यांना अडचणीत‎ साजरे करावे लागले.‎ अनुदान जमा करण्यात शासन‎ जाणीपूर्वक चालढकल करत‎ असल्याचा आरोप करत येत्या आठ‎ दिवसात अनुदान शेतकऱ्यांच्या‎ खात्यात जमा झाले नाही तर येत्या‎ १३ फेब्रुवारीला उप विभागीय‎ अधिकारी कार्यालयावर आसूड‎ मोर्चा काढण्यात येणार असल्याचा‎ इशारा तालुकाध्यक्ष गणेश राजबिंडे,‎ शिवाजी महाराज भोसले, रमेश‎ गायकवाड, तात्याराव मोरे, वामन‎ सोळंके, वैजनाथ दराडे आदींनी‎ दिला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...