आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवमान:महापुरुषांचा अवमान सहन करणार नाही : देशमुख

जालना7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल जालना जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन करून कोश्यारी यांच्या धोतराचे प्रतिकात्मक दहन केले. महापुरुषांचा अवमान सहन केला जाणार नाही, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी दिला.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख, प्रदेश सरचिटणीस कल्याण दळे, प्रा.सत्संग मुंढे, महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षा नंदा पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी शिवरायांबाबत केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध व्यक्त करून कोश्यारी व त्रिवेदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी फकिरा वाघ, गणेश राऊत, अण्णासाहेब खंदारे, महावीर ढक्का, विजय चौधरी, निलकंठ वायाळ, अशोक उबाळे, राजेंद्र गोरे, सुभाष कोळकर, राम सावंत, फकिरा वाघ, डी. आर. खिल्लारे, अण्णासाहेब खंदारे, चंद्रकांत रत्नपारखे, इरफान सिद्दिकी, वैभव उगले, विष्णू भालेराव, करीम बिल्डर, सोपान सपकाळ, गणेश चांदोडे,गणेश खरात, जावेद बेग, दिलीप चव्हाण, शीतल तनपुरे, चंदाताई भांगडिया, संगिता पांजगे, सारिका वरणकर,मंजू जाधव आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...