आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शैक्षणिक वर्षात घेतलेल्या उपक्रमांची दिली माहिती; उमरी जि. प. प्रशालेत शिक्षण परिषद

सिंधी काळेगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना तालुक्यातील सावंगी तलान केंद्रांतर्गत जिल्हा परिषद प्रशाला उमरी येथे शालेय शिक्षण परिषद घेण्यात आली. अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून साधन व्यक्ती डॉ. करुणा हिवाळे, शीतल मिसाळ, केंद्रप्रमुख भागवत जेटेवाड, मांदळे, कृष्णा गाडेकर, मुख्याध्यापक राठोड, रुद्रे, काळे, भुरे, होनवडजकर, कोरधने, डासाळकर,पऱ्हाड, ईरमले, बोलसुरे, श्रीखंडे, तळेकर, खिलारे, साठेवाड, नाडे आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. करुणा हिवाळे यांनी शाळापूर्व तयारी पहिले पाऊल, विद्यार्थी प्रवेश, निपुण भारत अंतर्गत पार्श्वभूमी, गरज, महत्त्व यामधील शिक्षकाची भूमिका याबाबत मार्गदर्शन केले. एफएलएन मूल्यमापन, आनंददायी अभ्यासक्रम अंमलबजावणी विषयी केंद्रप्रमुख भागवत जेटेवाड यांनी माहिती दिली. विद्यांजली पोर्टल व शाळा रजिस्ट्रेशनबाबत सतिश श्रीखंडे यांनी माहिती दिली. तर साक्षरता व संख्याज्ञान आणि अध्ययन स्तर, शाळा स्तर नियोजन, प्रपत्र विषयी शीतल मिसाळ यांनी मार्गदर्शन केले. अध्ययन अध्यापनात साहित्याचा परिणामकारक वापर, मराठी गणित साहीत्य पेटी, कृतीपुस्तिका याविषयी काळे माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक प्रशांत भुरे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...