आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंठा:देवी रस्त्याचे काम त्वरित करण्यासाठी मंठा तहसील कार्यालयासमोर ठिय्या

प्रशासनाचे लक्ष वेधले3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शेतमजूर युनियन, सिटू आणि किसान सभा यांचे संयुक्त आंदोलन

देशव्यापी संप यशस्वी करण्यासाठी आणि देवी रस्त्याचे काम त्वरित करण्यासाठी मंठा तहसीलमध्ये शेतमजूर युनियन, सिटू, किसान सभा यांच्या वतीने संयुक्त आंदोलन करून तहसील कार्यालयात ठिय्या दिला.

केंद्र सरकारने केलेल्या कामगारविरोधी श्रमसंहिता, वाढती महागाई, बेरोजगारी, देशाच्या सार्वजनिक संपत्तीचे खासगीकरण या देशविघातक भांडवलदार धार्जिण्या कारभारास रोखण्यासाठी आणि भारतीय राज्यघटना आणि लोकशाही वाचण्यासाठी २८ आणि २९ मार्च राेजी देशव्यापी संप केला. संपामध्ये देशातील लाखो कामगार, शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्यार्थी, युवक सहभागी झाले होते. पेट्रोल, डिझेलच्या किमती जास्त आहेत म्हणून आंदोलन करण्यात आले.

या वेळी आंदोलकांनी एक तास तहसील कार्यालयात घुसून ठिय्या आंदोलन केले. या वेळी सचिन थोरात यांनी मंठा येथील देवी रोडच्या दुर्दशेविषयी तहसीलदारांशी चर्चा केली. कारण हा रस्ता तहसील कार्यालय, पंचायत समिती, कस्तुरबा गांधी शाळा, आयटीआय कॉलेज आणि मंठा तालुक्यातील प्रसिद्ध रेणुकामातेच्या मंदिराकडे जातो. त्यामुळे त्वरित या रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी केली. तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी आंदोलकांशी चर्चा करून तत्काळ रस्त्याचे काम सुरू करून स्थानिक प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले आणि धोरणात्मक निर्णय शासनाला त्वरित कळवण्याचे आश्वासन दिले. यामुळे हे आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले. या आंदोलनात शेतमजूर युनियनचे जिल्हा सचिव सचिन थोरात, दीपक दवंडे, कांता मिटकरी, दीपक शेळके, सिद्धार्थ देशमाने, भास्कर कांबळे, मैनाजी पितळे, मीरा देशमाने, श्रावण शिंदे, दत्ता बोराडे आदी सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...