आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:मूर्ती चोरीचा तपास लावण्यासाठी दैठणातील भाविकांची पायी दिंडी

तीर्थपुरी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घनसावंगी तालुक्यातील श्रीक्षेत्र जांबसमर्थ येथील श्रीराम मंदिरातील मुर्ती चोरीच्या घटनेला पाच दिवस उलटूनही चाेरीचा शाेध लावण्यात पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे दैठणा येथील भाविकांनी निषेध केला असून मूर्ती चाेरीचा तपास लावावा या मागणीसाठी शनिवारी (दि.२७) दैठणा ते जांबसमर्थ येथील श्रीराम मंदिरापर्यंत पायी दिंडी काढली.

समर्थ रामदासांच्या पावनभूमीत चोरीची घटना घडूनही कोणताही तपास लागत नसल्याने भाविकांत संताप व्यक्त होत आहे. विधिमंडळासह राज्यभरात या घटनेचे पडसाद उमटत आहे. त्यामुळे चोरीच्या तपासासाठी शासन व प्रशासनाने राज्यासह देशपातळीवर तपास यंत्रणा कामाला लावून लवकरात-लवकर मुर्तींचा ऐतिहासिक ठेवा परत मिळवावा, अशी मागणी दैठणा येथील भाविक गणेशराव पघळ यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...