आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवीचा मळा:रांजणीत दर्शनासाठी भाविकांची गर्दी

रांजणी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथे तुळजाभवानीचे ठाणे असून नवरात्रात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. गावाच्या दक्षिणेस एक किलोमीटर अंतरावर देवीचे मंदिर असल्यामुळे त्यास ‘देवीचा मळा ‘असे नाव पडले आहे. मंदिर परिसरात निसर्गरम्य आणि नयनरम्य वातावरण असून देवीसमोर दिपमाळा, परशुराम व इतर देवतांची छोट छोटी मंदिरे आहेत. मंदिरासमोर गाभारा, होम, पेयजल व्यवस्था आहे.

मंदीराबाबत आख्यायिका अशी सांगितली जाते की, तुका बोंबले हे निस्सीम देवीभक्त तुळजापूर येथे देवी दर्शनासाठी गेले होते. ते एका वाड्यात मुक्कामास थांबले. मध्यरात्री त्यांना भुकंप होण्याची जाणीव झाली. ते वाड्या बाहेर येऊन मोठ्याने बोंबलू लागले आवाज ऐकून लोक घराबाहेर पडले. थोड्याच वेळात मोठा भुकंप झाला. त्यांचा बोंबलल्यामुळे बरीच प्राणहानी टळली. ते ज्या वाड्यासमोर बोंबलले त्या समोरील चौकाला बोंबले चौक असे नाव पडलेले आहे. पुढे या भक्तांचे मरण तुळजापूर येथे झाले. तेथे त्या वेळी समाधी बांधण्यात आली. रांजणी येथुन शिवाजी महाराज यांचे काळापासुन पालखी जाते. आजही या पालखीला बोंबल्याची पालखी असे नाव आहे. दत्त पौर्णिमेचे दिवशी या पालखीला मान मिळतो.

बातम्या आणखी आहेत...