आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धम्म पदयात्रेचे केले स्वागत:काँग्रेस पक्षातर्फे जालन्यात‎ धम्म पदयात्रेचे केले स्वागत‎

जालना8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎ भगवान बुध्दांच्या पवित्र असिथसह‎ आंतराष्ट्रीय बौध्द भिक्कु संघ ११०‎ भिख्खु समावेश असलेल्या‎ ऐतहासिक भव्य धम्म पदयात्रेचे‎ बुधवार रोजी जालना शहरात‎ ठिकठिकाणी स्वागत करण्यात‎ आले. धम्म पदयात्रेचे आयोजक‎ सिध्दार्थ हत्ती अंबीरे (प्रदेशाध्यक्ष‎ कॉंग्रेस अनुसूचित विभाग)‎ यांच्यासह सिनेअभिनेते गगन‎ मलीक आणि भन्तेजींचे जालना‎ जिल्हा व शहर कॉंग्रेस‎ कमिटीच्यावतीने जिल्हाकार्याध्यक्ष‎ राजेंद्र राख, शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष‎ शेख महेमुद माजी नगरसेवक अजय‎ भरतीय, विनोद रत्नपारखे, दिनकर‎ घेवंदे, यांनी छत्रपती शिवाजी‎ महराज पुतळा चौक येथे मान्यवरांचे‎ शाल व पुष्पहार देवून स्वागत केले.‎

धम्म पदयात्रेचे नागेवाडी येथील‎ नालंदा विहारात मुक्काम असून‎ सकाळी यात्रा औरंगाबाद मार्गाने‎ प्रस्थान करेल दिनांक १७ जानेवारी‎ परभणी येथून सुरु झालेली पदयात्रा‎ दिनांक १५ फेब्रुवारीरोजी चैत्यभुमी‎ (दादर) मुंबई येथे पोहचणार आहे.‎ पदयात्रेच्या पाउलो पावली देशाची‎ सुख समृध्दी, आरोग्य समता, बंधुता‎ आणि सामाजिक एैक्यासाठी धम्म‎ देशना मंगल कामना करण्यात येणार‎ असल्याचे संयोजक सिध्दार्थ हत्ती‎ अंबिरे यांनी सांगीतले.‎

बातम्या आणखी आहेत...