आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम:इतिहास संशोधक लांडे यांना धनगररत्न पुरस्कार; धनगर प्रतिष्ठानतर्फे ठाणे येथे झाला कार्यक्रम

टेंभुर्णीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील होळकर राजघराण्यांचे इतिहास संशोधक रामभाऊ लांडे यांना ठाणे येथे धनगर प्रतिष्ठान,ठाणे जिल्हा व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ, ठाणे यांच्या वतीने २९ मे रोजी “धनगर रत्न” पुरस्काराने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

रामभाऊ लांडे यांनी गेल्या काही वर्षात इतिहास संशोधन करुन शोध निबंध सादर केली आहेत. तसेच ऐतिहासिक ठिकाणांना भेटी देत तेथील अज्ञात इतिहास संशोधन करून तो समोर आणण्याचे काम केले.महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्यभिषेक संबंधित अनेक महत्वपूर्ण दस्तऐवज शोध घेवून होळकर राजघराण्यांचा इतिहास पुस्तकाच्या माध्यमातून पुढे आणण्याचे काम केल्याने त्यांना साहित्यिक व लेखक म्हणून धनगर रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, नगरसेवक योगेश जानकर, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील, आयुक्त संजय हेरवाडे, धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...