आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दांपत्य:संविधानाचा प्रचार करणारे जालना शहरातील धारे दांपत्य

जालना2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील संतोष धारे, माधुरी धारे हे दांपत्य मागील एक वर्षापासून भारताच्या संविधानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. एखाद्या व्यक्तीने यश संपादन केले किंवा काही पुरस्कार मिळाला किंवा गृहप्रवेश, दुकानाचे उद्घाटन, वाढदिवस अशा प्रसंगी बुके, हार न देता ‘संविधानाची प्रास्ताविका’ किंवा “भारतीय संविधानाचे अंतरंग” हे पुस्तक देऊन अभिनंदन करतात. या उपक्रमात त्यांचा मुलगा शौर्य धारेही सहभागी असतो.

भारताचा स्वातंत्र्यलढा ज्या उदात्त मूल्यांनी प्रेरित झाला होता ती सर्व मुल्ये भारताच्या संविधानात अंतर्भूत आहेत. भारताचे संविधान हे लोकशाहीचा कोनशिला बनले आहे. भारताचे संविधानात स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही उच्च दर्जाची नीतिमूल्ये अंतर्भूत आहेत. ही मूल्ये जनमानसात रुजणे फार महत्त्वाचे आहे. तसेच आपल्या देशाचे पर्यायाने आपणा सर्व नागरिकांचे उद्दिष्ट भारत देश सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडवणे आहे.

वास्तविक समाजात वावरताना बहुसंख्य लोकांना भारतीय संविधानाची तोंडओळखसुध्दा नाही. त्यांना किमान आपली मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये, महत्त्वाची कलमे, परिशिष्ट,भाग, सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निकाल माहीत असावेत असे संतोष धारे यांनी सांगितले. सर्वसामान्य नागरिकांना भारतीय संविधानाची तोंडओळख व्हावी यासाठीच हा उपक्रम सुरु केले असल्याचे ते म्हणाले.

या उपक्रमाची सुरुवात त्यांनी जालना जिल्हा वकिल संघाचे माजी अध्यक्ष ॲड. अशोक तारडे यांच्यापासून केली. कुणाला एखादा पुरस्कार मिळाला, कुणाला परीक्षेत चांगले गुण मिळाले, कुणी विदेशातून उच्च शिक्षण घेऊन परत आले, कुणाचा गृहप्रवेश आहे, कुणाच्या दुकानाचे उद्घाटन आहे किंवा एखाद्याची सदिच्छा भेट आहे किंवा कुणाचा वाढदिवस आहे हे दाम्पत्य “भारताचे संविधानाची उद्देशिका” किंवा “भारतीय संविधानाचे अंतरंग” हे पुस्तक भेट देत आहे. आपल्या संपूर्ण हयातभर “भारतीय संविधानाच्या उद्देशिका” व “भारतीय संविधानाचे अंतरंग” पुस्तक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प या दांपत्याने केला आहे

बातम्या आणखी आहेत...