आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धरणे:परतूर येथे महावितरण कार्यालयासमोर धरणे

परतूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून रब्बी हंगामात पिके जोमात असताना महावितरण कडून कृषिपंपाची वीज तोडण्याचा फतवा काढण्यात आला आहे. महावितरणच्या या तुघलकी धोरणामुळे रब्बी हंगामातील पिकांनादेखील फटका बसण्याची शक्यता आहे. महावितरणने शेतकऱ्यांची वीज न तोडता तोडलेला वीजपुरवठा तातडीने जोडावा अशी मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटा तर्फे करण्यात आली आहे. गुरुवारी परतूर येथील महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब तेलगड, तालुका प्रमुख सुदर्शन सोळंके,युवा सेना तालुका प्रमुख गजानन चवडे, महिला आघाडीच्या कुंतिका भुसारे,शहर प्रमुख विदुर जईद, रामजी सोळंके, लक्ष्मीकांत कवडी,संजय गोंडगे,रामजी खवल,रंजीत कोल्हे, बाळू गाते, ज्ञानेश्वर शेळके,विजय चिखले, शरद भरुका ,गिताराम मुजमुले, प्रभाकर सोळंके ,उमेश मुजमुले, सखाराम इंगळे,भगवान अब्दल,शिवराम जाधव , शिवाजी वाघमारे, कारभारी हिवाळे, योगेश गाते ,मारुती मिंड, सुधाकर मुळे, विकास बिडवे, गणेश सराटे, भारत उगले, करण सराटे, सतीश सराटे, कृष्णा सराटे,राम सोळंके, अंकुश लासे, विवेक बाबर, रामा काटकर, उद्धव सोळंके, कल्याण टेकाळे, संतोषराव बिडवे , महादेव चवडे, गजानन सोळंके,अनंता बिडवे यांच्यासह तालुक्यातील आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...