आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील ढासला ते उज्जैनपुरी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. १५ किलो मीटर अंतरापर्यंत वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत अहो. त्यामुळे सदरील रस्त्याचे काम तत्काळ करण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे १५ किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण १५ वर्षांपूर्वी करण्यात आले होते.
बदनापूर तालुक्यातील ढासला ते उज्जैनपुरी या रस्त्याची अवस्था एखाद्या बैलगाडी रस्त्याच्यापलीकडे झालेली आहे. या रस्त्यावरून शेतकरी, नागरिक, शाळकरी विद्यार्थी ये जा करतात. पावसाळयात तर पायी चालणे मुश्किल झाले आहे. विकासाचा गाजावाजा करणारे लोकप्रतिनिधी मात्र या रस्त्याकडे सोयीस्करपणे दृलक्ष करीत आहेत. रस्त्यावर मोठाले खड्डे पडले आहेत. पावसामुळे त्यात पुर्ण पाणी साचल्याने खड्डयांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अनेकदा दुचाकीस्वार घसरुन पडून जखमी झालेले आहेत.
तसेच हा रस्ता राजुर ते पैठण महामार्गाला जोडुन असल्यामुळे वाहनांची सतत वर्दळ असते. ढासला येथे शाळा, महाविद्यालय असल्यामुळे परिसरातील सागरवाडी, पिरवाडी, मालेवाडी, वाल्हा, लक्ष्मणनगर येथील विद्यार्थ्यांना याच रस्त्यावरुन ये जा करावी लागते. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे मानव विकासाची मिशनची बस देखील बंद करण्यात आलेली आहे. ढासला रविवारी आठवडी बाजार भरतो. बाजारुकरांचेही हाल होत आहेत. दरम्यान, ढासला ते उज्जैनपुरी रस्त्याचे पंधरा वर्षांपूर्वी डांबरीकरण झाले होते. परंतु आता या रस्त्यावर जागोजागी खड्डे झाले असून नागरिक,विद्यार्थी आदींना सर्कशी सारखी कसरत करीत चालावे लागते. तातडीने रस्ता दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, नसता आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सरपंच राम पाटील यांनी दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.