आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडचण:जाळीचा देव मंदिरासमोरच वाहने उभी केल्याने अडचण

धावडा5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील उत्तरेस मराठवाडा खान्देश, विदर्भाच्या सिमेवर अजिंठा डोगर रांगेच्या उंच निसर्गरम्य परिसरात सर्वज्ञ श्री. चक्रधर स्वामीच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या श्रीक्षेत्र जाळीचादेव हे महानुभाव पंथाचे तीर्थक्षेत्र भाविक भक्तांचे श्रध्दास्थान आहे. येथे दर महन्याला पौर्णिमा निमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक या ठिकाणी मंदिरावर चंक्रधर स्वामीच्या दर्शनासाठी येतात.

परंतु या ठिकाणी वाहनतळ पार्किंगची व्यवस्था नसल्याने दूरवरुन येणाऱ्या भाविकांना आपली वाहणे रस्त्यावर च अस्थाव्यस्त लावली जातात. यामुळे भाविक भक्तांना मंदिरापर्यंत दर्शनासाठी जाण्याची फारच अरचण होत आहे. भाविकांची दुरावस्था वाहनांमुळे होत आहे. या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली नाही. भाविकांना मंदिराकडे जाण्याकरता अत्यंत त्रास होत आहे. याकडे मंदिर व्यवस्थापनाने व ग्रामपंचायत ने किंवा पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे अशी भाविकांची या ठिकाणी मागणी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...