आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:चित्रप्रदर्शनात डिजिटल पझल्स, फ्लिपबॉक्सचा अनुभव

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय, केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय आणि जिल्हा प्रशासन व दक्षिण मध्य रेल्वे, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र शासनाच्या ८ वर्षपूर्तीनिमित्ताने सेवा सुशासन आणि गरीब कल्याण विषयावर मल्टिमीडिया चित्रप्रदर्शनी भरवण्यात आली असून यात स्पिन ३६० डिग्री व्हर्च्युअल रिएटली, सेल्फी पॉईंट, डिजिटल पझल्स, फ्लिपबॉक्स आदी अनुभवायला मिळत आहे.

चित्रप्रदर्शनाच्या ठिकाणी आरोग्य विभाग, पोस्ट विभाग, नगर परिषदेचा आधार कार्ड, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, महा बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, आधार जोडणी व नवीन नोंदणी, आयुष्मान भारत, जिल्हाधिकारी कार्यालयाचे ई सेवा केंद्र आदी स्टॉल लावण्यात आले आहेत. या चित्रप्रदर्शनातील सांस्कृतिक कार्यक्रम, पथनाट्य, विविध स्पर्धा, रॅली आदींचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रदर्शनाला नागरिकांनी भेट देऊन सेवा सुशासन आणि गरीब कल्याण, गतिशक्ती व शासनाच्या योजनांची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन केंद्रीय संचार ब्यूरो, औरंगाबाद, जिल्हा प्रशासन व दक्षिण मध्य रेल्वे, जालना यांच्या वतीने करण्यात येत आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी केंद्रीय संचार ब्यूरोचे प्रदीप पवार, प्रीती पवार, शरद सादीगले, धरती धन ग्राम विकास संस्थेचे अध्यक्ष मिलिंद सावंत आदींनी परिश्रम घेतले. मंत्रालयांतर्गत येणाऱ्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, प्रशासन व दक्षिण मध्य रेल्वे, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने १७ ते २१ डिसेंबर या पाच दिवस जालना रेल्वेस्टेशन एन्ट्री गेट येथे चालणाऱ्या मल्टिमीडिया चित्रप्रदर्शनी उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जालनाचे सहायक आयुक्त, संपत चाटे, प्रबंधक, विनोदकुमार भारती, प्रेषित मोघे, संतोष देशमुख, श्रीकुमार मुंडे, कल्याण कवडे, पप्पू देशमुख, अर्चना सांगुळे आदी होते.

बातम्या आणखी आहेत...