आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:हसनाबाद येथील पोलिस निवासस्थानांची दुरवस्था; बांधकाम करण्याची मागणी

हसनाबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथे निजामकालीन पोलिस ठाणे गावात कार्यरत होते. आता मधुनगर भागातील सरकारी गायरानावर नवीन बांधकाम करून स्थलांतरित करण्यात आले. परंतु पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची निवासस्थानाची दुरवस्था झालेली आहे. यामुळे या परिसरात नवीन निवासस्थानाचे बांधकाम करण्याची मागणी होत आहे.

आजमितीला सहाय्यक पोलिस निरीक्षक यांच्या निवासस्थानासह, पोलिसांचे निवासस्थाने जुने, मोडकळीस आलेले आहेत. जीर्ण झाल्यामुळे निवासायोग्य राहिलेले नाही. घरांचे छत किंवा भिंती रात्री बेरात्री केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच शौचालयाची व बाथरूमची सोय नाही. पावसाळ्यात यातील बहुतेक निवासस्थाने गळतात. यामुळे कर्मचाऱ्यांना स्वखर्चाने ताडपत्री टाकावी लागत आहे. पोलिस कर्मचाऱ्यांना राहण्याची व्यवस्था होत नसल्याने सहायक पोलीस निरीक्षकांसह, उपनिरीक्षक व इतर पोलिसांना गावात भाडयाने घर घेऊन किंवा अपडाऊन करावे लागत आहे.

यात आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. वेळप्रसंगी काही वेळा सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक व पोलिसांना थांबण्यासाठी महिला प्रतीक्षालयातच थांबावे लागते. त्यांच्या या गैरसोईकडे पोलिस अधीक्षकांनी लक्ष देऊन नवीन पोलिस कॉटर्सचे बांधकाम करून गैरसोय दूर करावी अशी मागणी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...